खासदार सुप्रिया सुळे यांनी केली सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी

खासदार सुप्रिया सुळे यांनी केली सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी

*कोकण Express*

*▪️खासदार सुप्रिया सुळे यांनी केली सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी*

*मालवण ः प्रतिनिधी*

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, संसदरत्न खास. सुप्रियाताई सुळे यांचे आज मालवणात फटाक्यांच्या आतषबाजीत उत्साहात स्वागत करण्यात आले. या दौऱ्यात त्यांनी मालवणच्या जय गणेश मंदिराला भेट देतानाच मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गला भेट देत किल्ले सिंधुदुर्गची पाहणी करीत छत्रपतींच्या या अमोल ठेव्याची माहिती घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी मालवणचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथे तर मालवण शिवसेना शाळेजवळ मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पुष्पगुच्छ देत खास. सौ. सुळे यांचे यांचे स्वागत केले.

मालवण दौऱ्यावर प्रथमच आलेल्या खास. सुप्रियाताई सुळे यांचे अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी जंगी स्वागत केले. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मालवण देऊळवाडा येथे खास. सुळे यांचे आगमन झाले. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डॉन्टस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कणकवलीचे नगरसेवक अबीद नाईक, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अर्चना घारे परब यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी खा.सुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे यांनी मालवणचे प्रवेशद्वार असलेल्या देऊळवाडा येथे पुष्पगुच्छ देत स्वागत केले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, मालवण शहर उपाध्यक्ष बाबू डायस, पं. स. सदस्य विनोद आळवे, मिलिंद घाडगे, संदेश फाटक, अँथोनी फर्नांडिस, सदप खटखटे आदी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

मालवण शिवसेना शाखेजवळ खास. सुप्रिया सुळे यांची गाडी येताच मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी स्वागत केले. यावेळी श्री. मराळ, पूजा तोंडवळकर, मंदार केणी आदी व शिवसैनिक उपस्थित होते. त्यानंतर मालवण मेढा येथील प्रसिद्ध जय गणेश मंदिराला खास. सुळे यांनी भेट दिली. यावेळी मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्यासह जय गणेश मंदिराचे श्री. लुडबे व व्यवस्थापन समितीने सुळे यांचे स्वागत केले.

सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट

यावेळी खा. सुळे यानी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली यावेळी त्या शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपतीच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाल्या व त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!