ओंकार युवक कला-क्रीडा मंडळाच्या “दीपावली शो-टाईम” कार्यक्रमाचा शुभारंभ

ओंकार युवक कला-क्रीडा मंडळाच्या “दीपावली शो-टाईम” कार्यक्रमाचा शुभारंभ

*कोकण Express*

*ओंकार युवक कला-क्रीडा मंडळाच्या “दीपावली शो-टाईम” कार्यक्रमाचा शुभारंभ…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

ओंकार युवक कला क्रीडा मंडळ सातवायगणीकडून आयोजीत दीपावली शोटाइम स्पर्धेचा मोठया उत्साहात सरपंच गीतांजली कांबळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला.
वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर सातवायंगणी येथील ओमकार कला क्रीडा मंडळ यांनी दीपावलीनिमित्त दीपावली शो टाइम या सांस्कृतिक महोत्सवाचा चे आयोजन केले होते. या महोत्सवाचा शुभारंभ पेंडूर सरपंचगीतांजलीकांबळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, व मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती सदस्य यशवंत उर्फ बाळू परब, वेंगुर्ला तालुका ओ बी सी सेल अध्यक्ष नितीत मांजरेकर, देवा कांबळी, तानाजी साळसकर, योगेंद्र राऊत, मदन मुरकर, सौ साळगावकर, राकेश मांजरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष गावडे, बबन नाईक, गोविंद वैद्य आदि मान्यवर उपस्थित होते.
हेमंत मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना,गेली 14 वर्षे अविरत पणे आपले कार्य करत असून सांस्कृतिक कार्यक्रम बरोबर समाजोपयोगी उपक्रम राबवित असल्याचे सांगीतले.तसेच मंडळाने आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असे उपक्रमही राबवावेत याला लागणारी मदत आपण करेन असे आश्वासन दिले.तर नितीन मांजरेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत, जि प सदस्य नितीन शिरोडकर यांच्या माध्यमातून पेंडूर गावातील विकास कामासाठी किती निधि उपलब्ध झाला आहे याची माहिती दिली.तसेच शिवसेनेच्या माध्यमातुन या गावासाठी याही पूढे निधि दिला जाईल असे सांगीतले. देवा कांबळी यांनी आपले मत व्यक्त करताना सातवायंगणी वाडीतील हे मंडळ विविध उपक्रम राबवित असताना वाडीतील गरजूनाही मदत करण्यासाठीं नेहमीच पूढे असतात. या वाडीची एकजूट अबाधित असून त्यांची एकजूट हिच खरी ओळख आहे असे सांगीतले. शिक्षक तानाजी साळसकर यांनी मत व्यक्त करताना हे मंडळ मला कधीच परक वाटले नाही एवढ्या आत्मीयतेने या मंडळातील कार्यकर्ते वागतात.शाळेसाठी या मंडळाने पुढाकर घेवून सेवा सुविधा पुरवाव्यात असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळू परब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हे मंडळ अविरतपणे गेली 14 वर्षे कार्य करत आहे याचे कौतुक करत तुमच्यातील एकजूट अशीच ठेवा आणि या मंडळाचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करा असे आवाहन केले.या शुभारंभकार्यक्रम वेळी यशवंत उर्फ बाळू परब, हेमंत मराठे, नितिन मांजरेकर, राकेश मांजरेकर, तानाजी साळसकर यांचा मान्यवरांचा हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पेंडूर गावाच्या विकासासाठी शिवसेना नेहमीच मदत करेल असे आश्वासनही दिली. या शुभारंभ कार्यक्रमा नंतर महोत्सवात जिल्हास्तरीय लहान व मोठ्या गटात रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत एका पेक्षा एक नृत्य सादर करत स्पर्धकांनी रसिकांना मंत्रमुग्ध मुग्ध केले.या स्पर्धेचे परीक्षण महेंद्र मातोंडकर व गीतांजली मातोंडकर यांनी केले.तर सूत्रसंचालन निलेश वैद्य यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!