*कोकण Express*
*कणकवली पंचायत समितीचे 17 नोव्हेंबर रोजीचे उद्घाटन रद्द*
*आमदार नितेश राणे यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली पंचायत समिती नूतन इमारतीचा उद्घाटन कार्यक्रम १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. परंतु दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी केंद्रीय मंत्री मंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक नवी दिल्ली येथे तातडीने आयोजित करण्यात आल्याने कणकवली पंचायत समिती नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ रद्द करण्यात येत आहे. असे आमदार नितेश राणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. या उद्घाटनाची पुढील तारीख निश्चित झाल्यावर सर्वांना जाहीर रित्या कळविण्यात येईल असे श्री राणें यांनी म्हटले आहे.