*कोकण Express*
*▪️हुंकार या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामीण भागातील गरीब होतकरू विध्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*कासार्डे ः संजय भोसले*
हुंकार सामाजिक प्रतिष्ठान(रजि.)मुंबई ही संस्था सातत्याने सामाजिक हित जपत प्रामुख्याने शैक्षणिक, सामाजिक,आरोग्य विषयक मदत गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.याच संस्थेच्या वतीने देवगड तालुका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
कोकणातील देवगड तालुक्यातील गोवळ लिक्कीवाडी,धालवली धनगरवाडी,वेळगीवे कोकरेवाडी, नारिंग्रे,वाघिवरे कोकरेवाडी आदि गावातील गरीब होतकरू विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे किट (वह्या,पेन बॉक्स,पेन्सिल बॉक्स,कंपास,फेविकॉल, रंगपेटी) व खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.सुनिल कोकरे,उपाध्यक्ष श्री.गणेश कोकरे,समाजसेवक श्री.रामचंद्र(बाळू)कोकरे,सखाराम काळे,बापू काळे,पांडुरंग कोकरे,अरुण कोकरे,प्रवीण कोकरे,सागर खरात,प्रकाश झोरे,सनीता कोकरे,दीक्षा हुंबे आदि उपास्थित होते.या उपक्रमात प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी चांगले सहकार्य केले,शैक्षणिक साहित्य पाहून विध्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसून आले.कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.गणेश कोकरे यांनी केली तर उपस्थित विद्यार्थी पालक व ग्रामस्थांचे तसेच सदर उपक्रमास ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार श्री.सुनिल कोकरे यांनी मानले.