*कोकण Express*
*▪️फोंडाघाट पावणादेवी ग्रामस्थांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश.*
*फोंडाघाट ः संंजना हळदिवे*
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. नामदार उद्धवजी ठाकरे साहेब, खासदार विनायकजी राऊत साहेब, पालकमंत्री मा.ना. उदयजी सामंत साहेब यांच्या कार्याने प्रेरित होवून जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली जि. प. सदस्य संजय आंग्रे, माजी सभापती संदेश पटेल, यांच्या सहकार्याने फोंडाघाट पावणादेवी वाडीतील ग्रामस्थांनी व शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतिशजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश करीत हाती शिवबंधन बांधले व भगवा हाती घेतला.
यावेळी ठाकूर गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली तसेच कमलाकर गोविंद महाजन , उदय ठाकूर, शशिकांत ठाकूर, सुनील तारळेकर, संतोष राणे, संतोष तावडे, सुनील तावडे, एकनाथ तावडे, बाबाजी वाळवे, अभिजित वाळवे, प्रकाश वाळवे, चंदू राठोड, रमेश तेली, मारुती वायगंणकर, मधुकर तेली, रोहन सुनील तारलेकर, मंदार ठाकूर, समीर सावंत, गणेश तेली, नंदकुमार ठाकूर, गणेश तेली, सदानंद तेली, प्रथमेश महाजन व कार्यकर्त्यानी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच विजय जामदार यांची शाखाप्रमुख पदी निवड करण्यात आलीी
यावेळी सतीश सावंत यांनी भाषणात सांगितले तुम्हीं आमच्या आता कुटूंबातले सदस्य झाला आहात. तुमच्या केसालाही धक्का लागु देणार नाही. तुमची विकास कामे टप्प्याटप्याने घेऊ. पावणादेवी वाडीचा सर्वांगीण विकासाची जबाबदारी शिवसेना पक्ष घेण्यास कटिबद्ध राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, माजी चेअरमन राजन नानचे, माजी सरपंच सुभाष वरवडेकर, माजी सभापती आबू पटेल, श्याम भुवड, शाखाप्रमुख सुरेश टक्के, शेखर लिंग्रस, सतीश मेस्त्री व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ठाकूर गुरुजी व बाळा महाजन यांनी केले.