*कोकण Express*
*▪️फोंडाघाट आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आवास महा कार्यक्रम कणकवली पं.स. सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते संपन्न*
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आवास महा कार्यक्रम शुक्रवार दि.12/11/2021 रोजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रपत्र ब यादीतील लाभार्थी श्री.मोहन तुकाराम वारंग, श्रीम.राजेश्री राजेंद्र दळवी व श्री.अशोक पांडुरंग दळवी रा.फोंडाघाट ता.कणकवली यांचे घरकुल चा गृहप्रवेश मा. श्री मनोज रावराणे,सभापती पं. स कणकवली, श्री.प्रकाश पारकर उपसभापती, मा.सौ सुजाता हळदीवे पं. स सदस्या यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी श्री. सुनिल लाड पं. स.सदस्य, श्री सतिश जाधव कृषी अधिकारी, श्री.प्रमोद पालकर कनिष्ठ प्रशासन अधिकारी,श्री चौलकर ग्रामविकास अधिकारी फोंडाघाट आदि उपस्थित होते.