*कोकण Express*
*▪️महाराष्ट्रराज्य शासन निर्णयाने शिष्यवृत्ती परिक्षा केल्या आणखी महाग*
*▪️इयत्ता ५वी व इयत्ता ८वी च्या शिष्यवृत्ती परिक्षा, प्रवेश शुल्क व परिक्षा शुल्कात भरघोस वाढ*
*कासार्डे ः संजय भोसले*
शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ या वर्षापासून सुरू होणाऱ्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय शासनदरबारी घेण्यात आला असून आधीच महागाईने त्रस्त असलेल्या पालक वर्गाला हा आणखी एक मोठा दे धक्का आहे.आधीच उल्हास त्यात चातुर्मास या उक्ती प्रमाणे.
शिष्यवृत्ती परिक्षेसाठी आवेदन पत्रे भरणे, प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिकांची छपाई, उत्तर पत्रिकांचे स्कॅनिंग, निकाल जाहीर करणे ,गुणवत्ता याद्या तयार करणे ,इत्यादी कामकाजा साठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येतो. सद्यस्थितीत वाढलेल्या महागाईमुळे प्रचलित दरामध्ये सुधारणा करून नवीन दर निश्चित करण्या बाबत शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार प्रवर्गनिहाय प्रवेश शुल्क व परिक्षा शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे.
ही वाढ पुढील प्रमाणे राहिल .
*प्रवेश शुल्क:—* बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी अगोदर २०रू. होते त्याऐवजी आता ५०रू. करण्यात आले आहेत.
तसेच मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही २०रू. ऐवजी ५०रू. करण्यात आले आहेत.
*परिक्षा शुल्क:—* बिगर मागास विद्यार्थ्यांसाठी ६०रु. ऐवजी १५०रु. येवढी दुपटीहून अधिक वाढ केली असून मागास व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ००रु (म्हणजे परिक्षा फी नव्हती ) ती आता ७५रु. करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या वरुन असे लक्षात येते की भविष्यात गरीब कुटूंबातील मुलांना शिक्षण घेणे , पात्रता असून शिष्यवृत्ती परिक्षे पासून वंचीत राहणे , या व अशा अनेक शैक्षणिक उपक्रमांना मुकावे लागणार आहे.
वरील सर्व सुधारित शुल्क शासन आदेशाच्या दिनांका पासून लागू राहणार असून हा शुल्कवाढीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www. Maharadhatra.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.