*कोकण Express*
*राज्यात नाट्यगृह,सिनेमा थिएटर सुरू करण्यास परवानगी*
*ठाकरे सरकारचा निर्णय; मात्र खाद्यपदार्थ विक्रीला बंदी…*
*मुंबई ता.०४:*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बंद असलेली नाट्यगृह व सिनेमा थिएटर सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.मात्र सिनेमागृहात खाद्य पदार्थ विकण्यास बंदी राहणार आहे.तसेच कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे नाट्यगृह सिनेमा सिएटर चालकांसह कलाकारांना मोठा दिलासा मिळाला आहे .मात्र या काळात कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. तर नाट्यगृह सिनेमा थिएटरात नेहमीप्रमाणे खाद्यपदार्थ विक्री करण्यास बंदी राहणार आहे.तसेच स्विमिंग पूल सुरू करण्यासाठी सुद्धा सरकारची सकारात्मक भूमिका आहे.