*कोकण Express*
*अर्णव गोस्वामी यांच्यावर राज्य शासनाने केलेली कारवाई सूडाची…*
*नारायण राणेंचा आरोप;राज्यात खून, बलात्कार,ड्रग्ज प्रकरणात शासन मात्र गप्प…*
*ओरोस ः प्रतिनिधी*
राज्यात खुन, बलात्कार, ड्रग, अतिरेकी कारवाया बाबत राज्य सरकार कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. एका वाहिनीचे संपादक, जेष्ठ पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात २०१८ मध्ये बंद झालेल्या चौकशी प्रकरणात आत्महत्तेस प्रवृत्त केल्या प्रकरणी तब्बल ५०० पोलिस नेत घरातील लोकांशी असभ्य वर्तन करत रायगड पोलिसांनी अटक केली. ही ठाकरे सरकारची सुडाची कारवाई असून, आपण याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. असे मत भारतीय जनता पक्षाचे नेते. खा नारायण राणे यांनी व्यक्त केले.
रिपब्लिकन टीव्ही चे संपादक अर्णव गोस्वामी यांना बुधवारी रायगड पोलिसांनी त्यांच्या घरात घुसून अटक केली. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खासदार नारायण राणे यांनी पडवे येथील मेडिकल कॉलेज येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ मिलिंद कुळकर्णी उपस्थित होते.
खा राणे यांनी या विषयावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरताना ही कारवाई या पत्रकाराने अभिनेता सुशांत राजपूत, दिशा या केसमधे ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचे असलेले संबंध समोर आणले. यामुळेच सुडबुद्धिने केली आहे. त्याच बरोबर गोस्वामी यांच्या कुटुंबियांनाही अपमानस्पद वागणूक दिली आहे. त्यामुळे आपण या कारवाईचा तीव्र निषेध करत आहोत. असे सांगतानाच सुशांत, दिया तसेच रिया खान या केस नाजिकच्या असून तेथील पोलिसांचा पराक्रम जनतेला न्यात आहे.
एका संपादका विरोधात जुन्या केसचा संदर्भ घेत तब्बल ५०० पोलिस घेऊन असे धाडस करता मग मुंबईमध्ये होत असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पराक्रम का दाखवत नाही, असा सवाल करत या सरकारच्या प्रमुखांना कायद्याची जाण नाही. अमलबजावणी कशी करावी माहीत नाही. सरकार चालवायला असमर्थ ठरलेले मुख्यमंत्री सत्तेचा दुरुउपयोग करत आहेत. नेहमी शिवाजी महाराजांचे नाव सांगून काम करणाऱ्या या सरकारने महाराजांचे नाव बदनाम केले आहे. त्यांनी हे नाव घेणे बंद करावे आणि महाराजांची बदनामी थांबवावी असा सल्लाही खा राणे यांनी ठाकरे सरकारला दिला.