*कोकण Express*
*▪️शिवसेना ओबीसी सेलच्या वेंगुर्ले तालुकाप्रमुखपदी नितीन मांजरेकर…*
शिवसेना ओबीसी सेलच्या वेंगुर्ले तालुकाप्रमुखपदी आडेली गावचे सुपुत्र नितीन मांजरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवा सेनाप्रमुख व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यांच्या नियुक्तिचे पत्र शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थित आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते वेंगुर्ले येथील मेळाव्यात देण्यात आले.
आडेली गावापासून राजकारण सुरू करणारे नितीन मांजरेकर यांनी आडेली गाव तंटामुक्ती अध्यक्ष या माध्यमातून अनेक विकास कामे केली. त्यानंतर राजकीय कार्याबरोबरच सामाजिक कार्य म्हणून सामाजिक सस्था, मंडळे यांना वैयक्तिक मदत केली. त्यामुळे शिवसेना पक्षाने त्यांच्या कामाची दखल घेत शिवसेना ओबीसी तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी दिली. आमदार दीपक केसरकर यांचे ते अत्यंत जवळचे कार्यकर्ते अशी ओळख आहे. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्याप्रमुख संजय पडते, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
नितीन मांजरेकर यांनी यापूर्वी राष्ट्रवादीवादी पक्षात असताना वेंगुर्ला तालुका सरचिटणीस व महाविद्यालयीन काळात एन. एस. यु. आय जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. जिल्ह्या दक्षता कमिटी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. सध्या ते विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम बघतात. त्यांच्या निवडीनंतर तालुका प्रमुख बाळू परब व वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी त्यांचे अभिनंदन केले.