वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरेत संगणक प्रदान समारंभ

वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरेत संगणक प्रदान समारंभ

*कोकण  Express*

*▪️वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरेत संगणक प्रदान समारंभ*

*▪️तळेरे हायस्कूल मध्ये सं गवगणक प्रदान समारंभ संपन्न*

*▪️प्रगतीपथ एज्युकेशन फाऊंडेशन च्या माध्यमातून तळेरे हायस्कूलला संगणक संच भेट*

*कासार्डे ः  संजय भोसले*

तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळेरेच्या एम. डी. देसाई सांस्कृतिक भवनात ‘संगणक प्रदान कार्यक्रम’ नुकताच संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिंधुदुर्गमधील सर्वश्रुत व्यक्तिमत्व, तळेरे गावचे सुपुत्र व वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे च्या स्थानिक समितीचे माजी अध्यक्ष डाॅ. प्रकाश बावधनकर यांनी भूषविले. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रगतीपथ एज्युकेशनल फाऊंडेशनचे व्यवस्थापक विनोद महाजन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी व स्मार्ट सखीच्या संचालिका तसेच प्रशालेची माजी विद्यार्थिनी वृषाली महाजन- कुडतरकर कार्यक्रमास लाभले.
याप्रसंगी प्रगतीपथ एज्युकेशनल फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने या संस्थेचे व्यवस्थापक व कार्यक्रमाचे अतिथी मा. विनोद महाजन व त्यांच्या सुविद्य पत्नी वृषाली महाजन यांचे हस्ते प्रशालेस सहा संगणकही प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाचे अतिथी व देणगीदार विनोद महाजन यांनी त्यांच्या संस्थेचे विद्यार्थी-विकासविषक कार्य उपस्थितांसमोर मांडले. यावेळी प्रशालेचे स्थानिक समिती चेअरमन मा. श्री. अरविंद महाडीक, जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार, कणकवली पंचायत समिती माजी सभापती दिलीपभाई तळेकर, तळेरे गावच्या सरपंच साक्षी सुर्वे , उपसरपंच दिनेश मुद्रस, माजी सरपंच प्रवीण वरूणकर, माजी उपसरपंच दीपक नांदलस्कर, तळेरे गावचे ग्रामस्थ व गांगेश्वर जीर्णोद्धार समिती, मुंबईचे अध्यक्ष सुर्यकांत तळेकर, उद्योजक राजू जठार, ग्रामस्थ उदयनाना तळेकर, निलेश तळेकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव, शाळा समिती सदस्य निलेश सोरप, संतोष जठार, संतोष तळेकर , प्रशालेचे मुख्याध्यापक एस.जी. नलगे, ए. एस. मांजरेकर, डी. सी तळेकर, पी. एन. काणेकर , ए. बी. कानकेकर , व्ही. व्ही. केसरकर , प्रकाश घाडी , देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. सहा.शिक्षक ए.एस. मांजरेकर यांनी विद्यालयातील अनेकविध उपक्रमांबाबत माहिती दिली.
कार्यक्रमप्रसंगी जि. प. सदस्य मा. बाळा जठार, कणकवली पं. स. सभापती मा. दिलीपभाई तळेकर व गांगेश्वर जिर्णोद्धार समिती, मुंबईचे अध्यक्ष मा. सूर्यकांत तळेकर यांनी मनोगत मांडले. अध्यक्षीय भाषणांतून मा. डाॅ. बावधनकर यांनी मुलांना प्रेरक विचार मांडले,स्फूर्तीदायक दृष्टीकोन मुलासमोर मांडला.तसेच स्व वामनराव महाडीक व विद्यालयाच्या यशाचे प्रतिबिंब असलेले स्वरचित काव्य सादर केले .
तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे चिटणीस मुख्य कार्यकारी अधिकरी श्रीकृष्ण खटावकर व कार्यकारी मंडळाने दूरध्वनीद्वारे प्रगतीपथ फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक मा. एस. जी. नलगे यांनी केले. सूत्रसंचालन ए. बी. कानकेकर तर आभार व्ही. व्ही. केसरकर यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!