*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात युवा स्वास्थ्य मिशन अंतर्गत लसीकरण कार्यक्रम संपन्न*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटमधील एन.एस.एस.व डी.एल.एल.ई. विभागामार्फत महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने मिशन युवा स्वास्थ्य मोहिमेंतर्गत 18 वर्षे वयानंतरच्या विद्यार्थ्यांसाठी 25 ऑक्टोबर 2021 ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या माेहीमे अंतर्गत महाविद्यालयात दिनांक 28.10. 2021 विशेष लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते याचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यी व शिक्षकांनी लाभ घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कामत या अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी म्हणाले की, कोरोनाच्या महामारीतून बाहेर पडण्यासाठी आपण जागरूक असले पाहिजे. तसेच आपण दुसऱ्यानाही जागरूक केले पाहिजे. मागील दीड वर्षाच्या कालावधीत आपण खूप नुकसान सहन केले आहे. असे पुढे होऊ नये म्हणून ही लस घेतलीच पाहिजे.
याप्रसंगी फोंडाघाट प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जंगम म्हणाले की, आजार टाळणे हाच उपाय आहे. लसीकरणाबाबत समाजामध्ये अनेक गैरसमज आहेत ते सर्व गैरसमज दूर करून आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ही लस समाजातील सर्व स्तरातील लोकांनी घेतली पाहिजे.
हे अभियान यशस्वी होण्यासाठी एन.एस.एस. विभाग विभागप्रमुख डॉ. सुरवसे व डी.एल.एल.ई. विभाग प्रमुख डॉ. संतोष रायबोले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बालाजी सुरवसे यांनी तर आभार डॉ. संतोष रायबोले यांनी मानले.