*कोकण Express*
*सिंधुदुर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत- डॉ अनिषा दळवी*
शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या तीन किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा या दुर्गम भागात आहेत. अशा शाळा समायोजन न करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ अनिषा दळवी यांनी केले.देवगड पंचायत समिती येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृहात शाळा व्यवस्थापन समितीच्या आयोजित बैठकी दरम्यान त्या बोलत होत्या.
शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत शासनाचे पत्रक सिंधुदुर्ग जिल्हा परिषदला प्राप्त झाले त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती डॉ दळवी यांनी प्रत्येक तालुका पातळीवर जात पंचायत समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेत त्यांच्याकडून याबाबत माहिती घेतली .यावेळी व्यासपीठावर देवगड पंचायत समिती सभापती लक्ष्मण पाळेकर ,माजी सभापती सुनील पारकर जि प सदस्य सो मनस्वी घारे गट शिक्षणाधिकारी प्रजापती थोरात आदी उपस्थित होते.
शिक्षण सभापती दळवी पुढे म्हणाल्या, कोकणचा बहुतांश भाग दुर्गम आहे दरी खोर्यानी वेढलेला आहे पावसाळ्यात नदी नाले ओढे पार करून विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो यामध्ये दुर्गम भाग, जंगल असेल यामध्ये जंगली प्राण्यांचा संचार आधी लक्षात घेता जिल्ह्यात वाडी वाडी ठिकाणी असलेल्या पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करू नये त्याबाबतचे शाळा व्यवस्थापन समिती तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी आम्हाला निवेदने दिली आहेत त्याचा आम्ही नक्कीच विचार करू आणि दुर्गम भागातील शाळा बंद होणार नाही, सर्वांना शिक्षण मिळावे या धोरणानुसार सिंधुदुर्गातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्रयत्नशील आहे.
शाळा व्यवस्थापन समिती या आंदोलनाच्या तयारीत शून्य ते पाच पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत शासनाचे पत्रक सिंधुदुर्ग जिल्हा परिषदला प्राप्त शासनाच्या या निर्णयानंतर जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समिती आक्रमक झाल्या असून शासनाच्या या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापन समिती यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.