*कोकण Express*
*सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या साहसी क्रीडा जिल्हाध्यक्ष पदी श्री मायकल डिसोजा यांची निवड*
*सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर*
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून शासन स्तरावर घोषित होऊन २३ वर्षापेक्षा जास्त काळ लोटून गेला असून जिल्ह्याच्या साहसीक्रीडा प्रकारामध्ये म्हणावा तसा पर्यटन विकास झाला नाही महासंघाच्या माध्यमातून सदर क्षेत्रात शाश्वत विकास होऊन साहसी पर्यटन क्रीडा प्रकारामध्ये रोजगार निर्मिती व जिल्ह्यातील साहसी पर्यटन देश विदेशात पोचविण्यासाठी महासंघातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत तसेच या क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आवश्यक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत या विषयी हॉटेल सायबा मालवण येथे झालेल्या सभेत साहसी क्रीडा जिल्हाध्यक्ष म्हणून आंबोली येथील श्री मायकल कोजामा डिसोजा यांची निवड करण्यात आली यावेळी महासंघ उपाध्यक्ष श्री कमलेश चव्हाण .मालवण तालुका अध्यक्ष श्री अवि सामंत शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर ,श्री उत्तम नार्वेकर,श्री संतान अल्मेडा,श्री स्वरुप वाळके, श्री वामन पालेकर,श्री राकेश अमरूस्कर ,श्री जेरोल्ड डीसोजा, श्री सहदेव सनाम ,श्री पास्कु देसा तसेच अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.अशी माहिती श्री बाबा मोंडकर जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली .