*कोकण Express*
*तरंदळेतील ते शिवसैनिक पुन्हा स्वगृही(भाजपात) परतले*
*कणकवली प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्यातील तरंदळे गावातील शिवसैनिकांचा भारतीय जनता पक्षात स्वगृही सोमवारी प्रवेश झाला. कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी या कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत , भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री , विभागीय अध्यक्ष राजू हिर्लेकर , संदीप सावंत , तसेच भाजपात प्रवेशकर्ते माजी सरपंच राजेश पाठक , ग्राम पंचायत सदस्य विवेक परब , ग्राम पंचायत सदस्य वैशाली घाडी , संजय परब , निखिल घाडी , शैलेश घाडीगावकर , कालिदास नाईक , विजय घाडीगावकर , सुभाष घाडीगावकर , सुरेश परब , वासुदेव घाडीगावकर , प्रकाश गावकर यांनी भाजपात प्रवेश केला अशी माहिती संदीप सावंत यांनी दिली.