*कोकण Express*
*अखिल राष्ट्रीय सिनेकलाकार, कामगार संघटना व भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या कणकवली तालुका सदस्य पदावर सचिन मेस्त्री यांची निवड*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चकवी वादक, भाजपा चित्रपट कामगार आघाडी तालुका सदस्यपदी कुमार सचिन मेस्त्री यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. राज्यात संघटना अधिक बळकट करण्यासाठी व संघटना वाढीसाठी नेहमी प्रयत्नशील रहावे तसेच कामगार व कलाकारांच्या समस्या व संघटनेने दिलेल्या कार्यक्रम कामगाराच्या शाश्वत विकासासाठी राबून देशाच्या सर्वांगीण प्रगती मध्ये चित्रपटातील कामगार व कलाकार वर्गाचे स्थान अधोरेखित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भाजपा कामगार आघाडी राज्य प्रदेशाध्यक्ष श्री गणेश ताठे, सिंधुदुर्ग भाजपा चित्रपट कामगार आघाडी अध्यक्ष संतोष तेली, भाजपा चित्रपट कामगार अधिकारी श्री विजय सरोज, भाजप सरचिटणीस सत्यवान गावडे यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र सचिन मेस्त्री यांना देण्यात आले.