*कोकण Express*
*वेंगुर्लेतील निवती-मेढा येथे घरात सिलेंडरचा स्फोट…*
*स्वयंपाक घराच्या भिंती कोसळून नुकसान*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
निवती-मेढा येथे तुकाराम मेथर यांच्या घरात सिलेंडरचा स्फोट झाला आहे. ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. यात स्वयंपाक घराचे नुकसान झाले आहे. मात्र स्फोट झाल्याचे लक्षात येताच घरातील व्यक्ती बाहेर पडल्याने सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. याबाबतची माहीती वेगुर्ले तहसीलदारांकडुन देण्यात आली आहे.
मेथर यांची पत्नी घरात नेहमी प्रमाणे आज सकाळी जेवण करत होती. यावेळी अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. दरम्यान प्रसंगावधान राखत घरातील व्यक्ती बाहेर पडल्या. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र स्वयंपाक घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळताच तलाठी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखक झाले आहेत.