*कोकण Express*
*फलटण पंचायत समिती पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्या दरम्यान दिली परुळेबाजार ग्रामपंचायतींना भेट…*
फलटण पंचायत समिती जिल्हा सातारा यांच्या पदाधिकारी अधिकारी यांनी आपल्या अभ्यास दौऱ्या दरम्यान परुळेबाजार, कुशेवाडा ग्रामपंचायतींना भेट दिली व विविध उपक्रमांची माहीती घेतली.
फलटण पं. स. ची टीम अभ्यास दौऱ्यादरम्यान सिंधुदुर्ग जिल्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यांना भेटी देत विविध उपक्रमांची माहिती घेत आहेत. यासाठी नुकतीच त्यानी परुळेबाजार ग्रामपंचायत ला भेट देऊन माहिती घेतली. यात ग्रा. पं. अंगणवाडी, व्यायामशाळा, काथ्या प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन याची माहिती घेतली. यावेळी उपसरपंच मनीषा नेवाळकर, माजी सरपंच प्रदीप प्रभू, ग्रामसेवक मंगेश नाईक, ग्रा. पं. कर्मचारी आदी उपस्थित होते. या दौऱ्यात विविध उपक्रमांची माहिती घेत समितीने समाधन व्यक्त केले. तसेच कुशेवाडा येथील प्रथमेश नाईक यांच्या सिद्ध ऍग्रो युनिट ला भेट देऊन सुपारी च्या झाडा च्या पोह्या पासून विविध वस्तू कश्या बनवितात याची माहिती घेतली.