*कोकण Express*
*सीएमपी प्रणालीद्वारे सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन अदा करावे*
*सुरेश पेडणेकर , चंद्रकांत अणावकर व सुधाकर देवस्थळी यांचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदकडे मागणी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जालना जिल्हा परिषद कार्यवाहीत आणत असलेल्या सीएमपी प्रणालीद्वारे सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन आदा करते. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सीएमपी प्रणालीचा अवलंब करुन निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्ती वेतन लवकरात लवकर आदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत विनंती मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे यांच्याकडे करण्यात आली. याबाबत योग्य ती चर्चा व वस्तुस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले. अशी माहिती सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रतिनिधी सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर व सुधाकर देवस्थळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. शासनाने निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रतिवर्षी दर ३ महिन्यांनी १ याप्रमाणे एकूण ४ पेन्शन अदालती आयोजित करून निवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत सुविधा निर्माण केली आहे. कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे गेले सुमारे दीड वर्ष या अदालती घेतल्या गेल्या नव्हत्या. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी झालेल्या २ व १८ ऑगस्ट २०२१ च्या चर्चेमध्ये ही बाब शिक्षण प्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिली होती. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये परिस्थिती निवळलेली असेल तर आपण पेन्शन अदालत आयोजित करु असे आश्वासित केले होते. त्याखातर २१ ऑक्टोबर २०२१ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समक्ष भेट घेऊन मार्च २०२२ अखेरपर्यंत किमान २ पेन्शन अदालती आयोजित करण्याबाबत विनंती केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यासाठी सहमती दर्शविली.
त्यानंतर शिक्षणाधिकारी प्राथमिक मुश्ताक शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन शिक्षक प्रतिनिधींच्यावतीने स्वागत करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या कामकाजासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच लवकरच एक बैठक आयोजित करुन सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न १ ९९ ४ पासूनचे निवडश्रेणीचे लाभ मंजूर करणे, ५ पदवीधर शिक्षकांची गेले अडीच वर्षे कनिष्ठ कार्यालयांकडून न येणारी माहिती तात्काळ उपलब्ध करुन त्यांना वरिष्ठश्रेणी मंजूर करणे, नव्याने सापडलेल्या ४२ सेवापुस्तकांची माहिती गेले अडीच वर्षे ३५८ शिक्षकांच्या यादीत समाविष्ट केली जात नाहीत ती तात्काळ समाविष्ट करणे. ०४ डिसेंबर २०१८ ने मंजूर केलेल्या १९८६ + २ या शिक्षकांना निवडश्रेणीचे त्यांचे आर्थिक लाभ तात्काळ आदा करणे. अद्यापही सुमारे ६५ पदवीधर सेवानिवृत्त शिक्षकांची सेवापुस्तके सापडत नाहीत त्यांचा तात्काळ शोध घेणे इत्यादी बाबींवर चर्चा होऊन प्रश्न मार्गी लागण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यानंतर वल्लरी गावडे या मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर नव्याने रुजू झाल्यामुळे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामकाजासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच त्यांना जालना जिल्हा परिषद कार्यवाहीत आणत असलेल्या सीएमपी प्रणालीद्वारे सेवानिवृत्त शिक्षकांचे निवृत्ती वेतन आदा करते. त्याचप्रमाणे या जिल्हा परिषदेने सीएमपी प्रणालीचा अवलंब करुन निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांचे निवृत्ती वेतन लवकरात लवकर आदा करण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत विनंती करण्यात आली. त्यावर याबाबत योग्य ती चर्चा व वस्तुस्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले. अशी माहिती सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर व सुधाकर देवस्थळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.