*कोकण Express*
*वीज कनेक्शन तोडल्याने सावंतवाडीत शिवसेना आक्रमक ; अधिकाऱ्यांना घेराव….*
*ग्राहकांना टप्याटप्याने वीज बिल भरण्याची मुभा द्या, केली मागणी…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील लाखे वस्तीतील वीज कनेक्शन तोडल्याच्या कारणावरून तसेच कार्यालयात एकही अधिकारी नसल्याने आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.विद्युत वितरणच्या अंदाधुंदी कारभाराचा यावेळी निषेध करण्यात आला.दरम्यान ग्राहकांना टप्प्याटप्प्याने विज बिल भरण्याची मुभा द्या, तसेच पूर्व कल्पना न देता कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नका, अशी मागणी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली. याबाबत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना आज घेराव घालण्यात आला.
यावेळी नगरसेविका अनारोजीन लोबो,सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, भारती मोरे,माजी नगरसेवक सुरेश भोगटे,शब्बीर मणियार,संजय पेडणेकर,महेश परुळेकर,विशाल सावंत,लक्ष्मी लाखे,निशा लाखे, परविन लाखे,शुभांगी पाटील, लक्ष्मी पाटील,शिल्पा लाखे,संगीता लाखे आदी उपस्थित होते.
दरम्यान येत्या पंधरा दिवसात तेथील ग्राहकांनी विज बिल भरा, खंडित केलेली वीज कनेक्शन पुन्हा सुरळीत करू, असे लेखी आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी अधिकारी कार्यालयात न आल्यास कार्यालयाला टाळे लावू, असा इशारा शिवसेनेचे पदाधिकारी शब्बीर मणियार, नगरसेवक अनारोजीन लोबो यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्या अगोदर कल्पना द्या, तात्काळ वीज खंडित करू नका, अशी मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली. यापुढे अगोदर सूचना देण्यात येतील असे यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.