*कोकण Express*
*आता थाळ्या वाजवा, ढोल वाजवा म्हणणारे गप्प का?*
*केंद्र सरकारच्या आशीर्वादाने पेट्रोल डिझेल,महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ*
*केंद्र सरकार विरोधात वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा;शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ *
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
केंद्र व राज्य सरकारने कोविड नियमावलीत अनलॉक करूनही रेल्वेने मात्र अनलॉक केला नसल्याने ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांची आर्थिक लूट होत आहे. थाळ्या वाजवा, ढोल वाजवा म्हणणारे आता गप्प कशासाठी असा प्रश्न शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी उपस्थित करत केंद्र सरकार विरोधात वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कोरोना मुळे जग थांबले होते. त्यामुळे सर्व व्यवहारही ठप्प झाले होते. आता केंद्र व राज्य सरकार यांच्या निर्देशानुसार अनलॉक जाहीर होत आहे. मात्र या अनलाॅक मधून कोकण रेल्वे पूर्वपदावर आलेली नाही. प्रचंड महागाईमुळे लोक हैराण झाले असतानाच कोकण रेल्वे प्रवाशांची लूट करत आहे.कोविड काळात स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या. आता अनलाॅक झाल्यावर स्पेशल गाड्या बंद करून पूर्वीसारखेच तिकीट दर आकारले जावे म्हणून वेळ प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिला आहे. कोरोना मुळे कोकण रेल्वेच्या गाड्या बंद होत्या जसा कोविड प्रादुर्भाव कमी होत गेला तशा कोकण रेल्वेच्या गाड्या पूर्वपदावर येत होत्या यादरम्यान कोकण रेल्वेने स्पेशल गाड्या सोडल्या या गाड्यांच्या तिकिटाचा दर देखील महागडाच राहिला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह सुविधा असणाऱ्या सर्व नागरिकांना महागड्या तिकीटाचे आरक्षण करावे लागले त्यामुळे लोकांना आर्थिक भुर्दंड पडला आणि कोकण रेल्वेला मात्र त्याचा आर्थिक फायदा झाला असे रुपेश राऊळ यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या आशिर्वादाने पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने महागाई प्रचंड वाढली आहे. या महागाईमुळे लोक आर्थिकदृष्टया होरपळून जात आहेत.