सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या देवगड तालुकाध्यक्षपदी संजय धुरी, मनस्वी घारे यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या देवगड तालुकाध्यक्षपदी संजय धुरी, मनस्वी घारे यांची नियुक्ती

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या देवगड तालुकाध्यक्षपदी संजय धुरी, मनस्वी घारे यांची निवड*

*देवगड ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन क्षेत्रात अग्रेसर करण्याचा सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाचा मानस असून यासाठी महासंघा तर्फे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.गुरुवारी जामसंडे येथील सांस्कृतिक भवन सभागृहात पर्यटन महासंघाच्या झालेल्या सभेमध्ये, देवगड तालुका पर्यटन व्यावसायिक महासंघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या देवगड तालुका अध्यक्ष पदी संजय धुरी यांची तर महीला तालुकाध्यक्षपदी सौ. मनस्वी घारे यांची नियुक्ती करण्यात आला. तर हॉटेल व्यावसायिक रमाकांत आचरेकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर, मालवण तालुका अध्यक्ष अवि सामंत, लिकर संघटना जिल्हा अध्यक्ष शेखर गाड, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. प्रसाद करंदीकर आदी पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत देवगड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

जिल्ह्यात पर्यटन हा आघाडीचा उद्योग आहे. शेतकरी, महिला बचत गट, तरुण-तरुणी, होम स्टे, हॉटेल, रिसॉर्टच्या माध्यमातून राहण्या-खाण्याची व फिरण्याच्या सुविधांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन या गोष्टींमुळे पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेला आहे. देवगड तालुक्यामध्ये पर्यटन दृष्ट्या क्रांती व्हावी यासाठी, प्रत्येक क्षेत्र आपल्या परीने विकसित होणे गरजेचं आहे. त्यासाठी सर्व व्यवसाय एकत्र येऊन, एक दुसऱ्याला मदत करणे हे पर्यटनला अधिक चालना मिळवुन देऊ शकते यासाठी देवगड तालुका पर्यटन व्यावसायिक कार्यकारणी मध्ये सुसज्ज आखणी करून प्रत्येक क्षेत्रामध्ये पदभार देण्यात आले आहेत.

यामध्ये राजेंद्र पाटिल सचिव, – प्रशांत हडकर खजिनदार,
शहर अध्यक्ष-शाम बांदकर, टूरीस्ट व्हीअीकल संघटना अध्यक्ष- उल्हास मणचेकर, साहसी क्रीडा अध्यक्ष- वैष्णवी जोईल/श्रीकांत जोईल, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष- किरण पांचाळ, प्रसिद्धी विभाग आणि प्रवक्ता- ऋत्विक धुरी, वॉटर स्पोर्टस अध्यक्ष- लक्ष्मण तारी, मंगल कार्यालय अध्यक्ष-श्रीरंग पाटणकर, लीकर विभाग अध्यक्ष- रोहन शिरसाट, लॉजिंग अध्यक्ष- प्रल्हाद चोपडेकर, हॉटेल अध्यक्ष- निवृत्ती तारी, कातळशील्प ऐतिहासिक वारसा अध्यक्ष- अजित टाककर. अशा प्रकारे, प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास साधून पर्यटनात्म क्रांती घडविण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये हा पर्यटन महासंघ काम पाहणार आहे.

या पर्यटन व्यवसायाला एका अधिकृत धोरणांमध्ये समाविष्ट करुन, नव्या जोमाने व उत्साहाने पुन्हा सुरू करण्यासाठी पर्यटन संचालनालय व सिंधुदुर्ग महासंघाच्यावतीने पर्यटनातील विविध विषयांवर प्रशिक्षण वर्ग कार्यशाळा तसेच चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे. देवगड येथील चर्चासत्राचा उपक्रम दिनांक २४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ३:१५ वाजता सांस्कृतिक भवन, जामसंडे येथे आयोजित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!