*कोकण Express*
*कनेडी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने विविध उपक्रम उत्साहात साजरे*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कनेडीगट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी श्री. एम्. एम्. सावंत जुनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेत वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शन, ग्रंथदिंडी, भित्तीपत्रक निर्मिती व ललितलेख अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक २१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी व त्यांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन प्रशालेमध्ये करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन शालेय समिती खजिनदार गणपत सावंत यांनी सरस्वती पूजन व दीपप्रज्ज्वलन तसेच डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमापूजनाने केले. सदर कार्यक्रमाला शालेय समिती सदस्य नितीन सावंत, बावतीस घोन्साववीस,प्रभाकर चांदोस्कर, प्रशालेचे हितचिंतक अशोक सावंत, पर्यवेक्षक बयाजी बुराण यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी सर यांनी केले. सदर कार्यक्रमावेळी तनुश्री मसुरकर, कु. कृपा पेडणेकर, कु. मैत्रेयी आपटे, कु. निपुर्णा आडकर, सूरज डिचवलकर, हर्षवर्धन नानचे, कौस्तुभ मेस्त्री, अमोल जाधव यांनी ग्रंथ हेच गुरु याविषयी आपले विचार व्यक्त केले. शालेय समिती सदस्य नितीन सावंत यांनी याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. शालेय समिती खजिनदार गणपत सावंत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना वाचाल तर वाचाल असा मौलिक सल्ला दिला. सदर कार्यक्रमावेळी नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. भिवा कोरडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक समीर गुरव, दयानंद कसालकर व प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहाय्यक शिक्षक प्रसाद मसुरकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे वृत्तांकन सहाय्यक शिक्षक मकरंद आपटे यांनी केले.