*कोकण Express*
*कलमठ विकास सोसायटी अध्यक्षपदी रघुनाथ कोरगावकर तर उपाध्यक्षपदी सुनील मेस्त्री*
कणकवली तालुक्यातील कलमठ विकास सोसायटी निवडणुक या पूर्वी बिनविरोध झाली होती. सोसायटी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुक निवडणुक अधिकारी यू. यू. यादव यांच्या उपस्थितीत पार पडली. कलमठ विकास सोसायटी अध्यक्षपदी रघुनाथ कोरगावकर तर उपाध्यक्षपदी सुनील मेस्त्री यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कलमठ सोसायटीच्या संचालक निवडणुक बिनविरोध झाल्यानंतर अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवडणूक देखील बिनविरोध झाल्याने कलमठ गावाने जिल्ह्यात आदर्श निर्माण केला. यावेळी संचालक शंकर पुजारे, हमजा शेख, बबन गुरव, राजेंद्र नारकर, रमेश चव्हाण, महेंद्र कदम, नमिता कदम, दर्शना कुडाळकर, सत्यविजय गुडकर, सचिव कमलाकर डगरे उपस्थित होते.