*कोकण Express*
*४० वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आलेला तिलारी प्रकल्प अजूनही अपूर्ण*
*राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भाजप जाब विचारणार*
*नगराध्यक्ष संजू परब*
*सावंतवाडी ता.२१-:*
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी ४० वर्षांपूर्वी तिलारी प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. परंतु अजूनही तो प्रकल्प अपूर्ण आहे. याबाबत येत्या ८ दिवसात भाजपच्या शिष्टमंडळासह जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे सर्व पदाधिकारी घेराव घालत जाब विचारणार असल्याचा इशारा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी दिला आहे.