भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश सावंत यांची निवड

भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश सावंत यांची निवड

*कोकण Express*

*भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश सावंत यांची निवड*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी उमेश सावंत ( वायंगणी – मालवण ) यांची निवड जाहीर केली. यापूर्वी किसान मोर्चा च्या जिल्हा सरचिटणीस पदी कार्यरत असलेले उमेश सावंत यांना बढती देऊन जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती देण्यात आली.त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष असलेले बाळासाहेब सावंत यांची किसान मोर्चा च्या प्रदेश कार्यकारिणी वर शिफारस करण्यात आली.
भाजपा जिल्हा कार्यालय, कणकवली येथे किसान मोर्चाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. यावेळी संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, सरचिटणीस व किसान मोर्चा प्रभारी प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई, जि.का.का.सदस्य बाळा सावंत, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, मालवण ता.सरचिटणीस महेश मांजरेकर, ज्ञानेश्वर केळजी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली व संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी किसान मोर्चा म्हणून कार्यकर्त्यांची जबाबदारी व कार्य याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे मोदी सरकारने शेतकरयांसाठी केलेले कृषी कायद्यासंदर्भात विरोधक करत असलेला गैरसमज दूर करण्यासाठी गावा गावात किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बैठका घेऊन केंद्र सरकारची भूमिका शेतकरयांपर्यंत पोहचविण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच किसान मोर्चा च्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या योजना जास्तीत जास्त शेतकरयांना पोहचवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मार्गदर्शन केले.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी येत्या आठ दिवसात बेसीक भाजपा पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन किसान मोर्चाची जिल्हा कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे सांगितले.
यावेळी राजेश माळवदे – तरळे ( कणकवली ) , भुषण बोडस – पडेल ( देवगड ) , कीशोर नरे – हडी ( मालवण ) , गुरुनाथ पाटील – आंदुर्ले ( कुडाळ ) , हरीभाऊ केळुसकर – मेढा ( मालवण ), यशवंत उर्फ बापु पंडित – वायंगणी ( वेंगुर्ले ) , दामोदर मोतीराम नारकर – पियाळी ( कणकवली ) , सौ.सीमा सॅम्युअल काळे – पाट ( कुडाळ ) , प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु – मातोंड ( वेंगुर्ले ) , प्रकाश राणे – खोटले ( मालवण ) , प्रसाद भोजणे – कोळंब ( मालवण ) , सखाराम परब – सरंबळ ( कुडाळ ) , महेश वरक – पळसंब ( मालवण ) , मोहन जाधव – गोवेरी ( कुडाळ ) , दिपक सुर्वे – उपसरपंच चिंदर ( मालवण ) , संदीप पींगुळकर – पिंगुळी ( कुडाळ ) , ज्ञानेश्वर परब – खोटले ( मालवण ) , विजय परब – खोटले ( मालवण ) , प्रकाश मेस्त्री – चिंदर ( मालवण ) , सचिन मेस्त्री ( मालवण ) , संतोष वायंगणकर ( मालवण ) , कार्यालयीन मंत्री समर्थ राणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!