वैभववाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दि. २७ ऑक्टोबर पासून साखळी उपोषणाचा इशारा

वैभववाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दि. २७ ऑक्टोबर पासून साखळी उपोषणाचा इशारा

*कोकण  Express*

*वैभववाडी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दि. २७ ऑक्टोबर पासून साखळी उपोषणाचा इशारा*

*करुळ घाट मार्ग दुरुस्त करण्याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

 या वर्षीचा ऊस गाळप हंगाम लवकरच सुरु होत आहे. वैभववाडी तालुक्यातील जवळपासचा सर्व ऊस गगनबावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याला गाळपासाठी नेला जातो. यंदाच्या जोरदार पावसाचा तडाखा वैभववाडी ते गगनबावडा या मार्गाला बसलेला आहे. रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे व खचलेल्या साईडपट्यांमुळे हा रस्ता वाहतुकीस पुर्णपणे धोकादायक बनलेला आहे. त्यामुळे करुळ घाटातून ऊस वाहतूक करताना ट्रक पलटी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मागील वर्षी ऊस वाहतुकीचे ट्रक पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. घाट रस्त्याच्या या अशा अवस्थेमुळे गेले दोन – तीन वर्षे कोकणातील ऊस तोडणी घाट रस्ता दुरुस्त झाल्यानंतर बिलंबाने जानेवारी – फेब्रुवारी महिन्यात सुरुवात केली जाते. कोकणातील उष्णता आणि रानटी जनावरे यांपासून उसाची मोठ्या प्रमाणात नासधूस होते, तसेच अती उष्णतेमुळे ऊसाच्या वजनात घट होत असते. यामुळे गेली दोन वर्षे शेतकऱ्यांना घाटमार्ग दुरुस्त नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. या सर्व गोष्टींची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने लवकरच घाट मार्गाची डागडुजी करावी अन्यथा वैभववाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी करुळ घाटात दि.२७ ऑक्टोबर पासून साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे. या आशयाचे निवेदन आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके व पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना दिले आहे. शिवाय खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे,मा. शाखा अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण खारेपाटण यांनी निवेदनाची प्रत माहितीसाठी पाठवली आहे.

यावेळी किशोर जैतापकर, संजय मुरकर, विशाल पावसकर, विठोबा नारकर, संदिप तानवडे, राजेंद्र नारकर, नरेंद्र शिंदे, तसेच तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!