कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यासाठीची उद्घाटने आमदार वैभव नाईक अजून किती वर्षे करणार

कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यासाठीची उद्घाटने आमदार वैभव नाईक अजून किती वर्षे करणार

*कोकण Express*

*कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यासाठीची उद्घाटने आमदार वैभव नाईक अजून किती वर्षे करणार..?*

*मागील गेल्या सात वर्षापासून बांधून पूर्ण असलेले कुडाळ तालुक्यातील महिला व बाल रुग्णालय पूर्ण क्षमतेने कायम चालू करण्यासाठी सत्ताधारी आमदार खासदार ठरले निष्क्रिय..*

*सत्ताधाऱ्यांचा तारीख पे तारीख हा कार्यक्रम म्हणजे निष्क्रियतेची प्राचितीच.. मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

गेल्या सात वर्षापासून कुडाळ मालवण मतदार संघातील जनतेला निवडून येताना दिलेली कोणतीच आश्वासन पूर्ण न करता आमदार फक्त फक्त फोटोग्राफीचे व्रत घेऊन जनतेला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या जनतेची नाराजी कमी करण्यासाठी काहीतरी करतो असे भासविण्यासाठी सात वर्षापासून बांधून पूर्ण असलेली महिला व बाल रुग्णालय इमारत पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी गेल्या एक-दोन वर्षापासून हे आमदार आरोग्यमंत्र्यांना निवेदने देत आहेत आणि आज पुन्हा एकदा अर्धवट स्वरूपाचे उद्घाटन करून येत्या दोन महिन्यात आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन पूर्ण क्षमतेने हे महिला बाल रुग्णालय सुरू करण्याचे तिसऱ्यांदा आश्वासन देत आहेत.

खासदार विनायक राऊत यांनी सुद्धा वर्ष भरा पुर्वी सदरचे महिला बाल रुग्णालय तीन महिन्यात सुरू करतो असे आश्वासन दिले होतेच.अपुऱ्या आरोग्य व्यवस्था तसेच कोरोनामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास तेराशे हून अधिक बळी गेले याला हे जिल्ह्यातील राज्य करते जबाबदार आहेत.

वेतना अभावी जिल्ह्यातील असलेलेच डॉक्टर राजीनामे देत आहेत.त्यामुळेच आगामी निवडणुकांच्या तोंडावर जनतेला पुन्हा एकदा रस्ते सुस्थितीत आणणे, आरोग्य सुविधा देणे व इतर प्रलंबित कामे करण्यासाठी पुन्हा एकदा दोन चार महिन्याच्या आश्वासनांचे गाजर दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न या भागाचे आमदार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!