*कोकण Express*
*महाविकास आघाडीतील जिल्हा बँक निवडणुकीचे जागा वाटप पूर्ण*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपा सत्ता मिळवणारच*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून या बँकेच्या निवडणुकीत कोणतेही राजकारण येऊ नये अशी आमची ही इच्छा होती. मात्र महाविकास आघाडीतील जिल्हा बँक निवडणुकीचे जागा वाटप पूर्ण झाले असल्याने सहकार क्षेत्रातील संस्था, लोकांना सोबत घेऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेवर भाजपा सत्ता मिळवणारच असा ठाम विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला. कणकवलीत पत्रकारांशी श्री तेली बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील जागावाटप पूर्ण झाल्याचा दावा करत असतानाच सहकार क्षेत्रात राजकारण येऊ नये अशी इच्छा देखील व्यक्त केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची भाजपची रणनीती पूर्ण झाली असून, चांगल्या पद्धतीने जिल्हा बँक ताब्यात घेणार असल्याचा दावा श्री तेली यांनी केला आहे.