*कोकण Express*
*कोळपे जि. प. मतदारसंघात १४ ऑक्टोबर रोजी शिवसेनेचा मेळावा*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात गुरूवार दि. १४ ऑक्टोबर, २०१९ सायंकाळी ठिक ४ शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कोल्हापूर सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आम. वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, शिवसेना युवा नेते संदेश पारकर, महिला आघाडी प्रमुख सौ निलम पालव, मुंबई नगरसेवक रमाकांत रहाटे, आदी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळाव्यासाठी कोळपे जि. प. मतदार संघातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केले आहे.