महिलांच्या कर्तुत्वाला अनोखी सलामी : चित्रकार अक्षय मेस्त्री याची संकल्पना

महिलांच्या कर्तुत्वाला अनोखी सलामी : चित्रकार अक्षय मेस्त्री याची संकल्पना

*कोकण Express*

*महिलांच्या कर्तुत्वाला अनोखी सलामी : चित्रकार अक्षय मेस्त्री याची संकल्पना*

*देवगड ः प्रतिनिधी*

देवगड तालुक्यातील गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री याने आपल्या संकल्पनेमधून नऊ देवी आणि सद्य परिस्थितीत आपल्या क्षेत्रात असामान्य कर्तुत्व करुन वेगळा ठसा उमठविलेल्या 9 महिलांना सलामी दिली आहे.

#अक्षय याने 4×15 फुट आकाराच्या कॅनव्हासवर ॲक्रॅलिक कलरने नवरात्रीच्या निमित्ताने 18 चित्रे साकारली आहेत. या कॅनव्हासला साडीचा आकार देण्यात आला आहे. त्यामुळे कॅनव्हास हा नऊवारी साडी असल्याचा काही क्षण भास होतो.

#ही चित्रे अक्षयने एकट्यानेच साकारली असून त्याला सुमारे 20 दिवस लागलेत.

#देवीची नऊ रुपे आणि आधुनिक नऊ दुर्गा यांचे रेखाटन त्याने केले आहे. त्यामध्ये 1) सरस्वती, 2) लक्ष्मी, 3) पार्वती, 4) अंबाबाई, 5) काली, 6) सीता,  7) राधा, 8) रुक्मिणी, 9) दुर्गा तर आधुनिक नऊ दुर्गामध्ये 1) सिंधुताई संकपाळ – सनाजकार्य, 2) पी..व्ही. सिधू – क्रीडा, 3) इंदिरा गांधी – राजकीय,  4) कल्पना चावला – विज्ञान, 5) आनंदी गोपाळ जोशी – वैद्यकीय, 6) लता मंगेशकर – संगीत, 7) सावित्रीबाई फुले -शिक्षण, 8) मादाम कामा – स्वातंत्र्यसैनिक, 9) मदर तेरेसा- समाजकार्य यांचा समावेश आहे.

#ही चित्रे त्याने आपल्या गवाणे येथील घरी ठेवण्यात आली असून ती पहायला येण्याचे आवाहन अक्षय याने केले आहे.

#अक्षय हा नेहमीच वेगळे उपक्रम करतो आणि नेहमीच त्याला सामाजिक किनार असते.

#नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या कर्तुत्वाला सलामी देण्यासाठी अक्षयने विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेल्या प्रातिनिधिक स्वरुपात 9 महिलांचे चित्र रेखाटले आहे.

#दुर्गा मातेची नऊ रुपे आहेत तशीच आजची महिला प्रत्येक क्षेत्रात कर्तुत्ववान बनली आहे. अशा सर्व कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी अक्षयने प्रातिनिधिक स्वरुपातील नऊ महिलांचे चित्र साकारले आहे. यातून देशाच्या तरुण पिढीने आदर्श घ्यावा, अशी संकल्पना अक्षयने बोलून दाखविले.

याबद्दल अधिक माहितीसाठी : अक्षय मेस्त्री, (चित्रकार) गवाणे
7744833983 / 9423893983

कृपया वरील माहितीवरुन आमच्या या उपक्रमाला यथायोग्य प्रसिध्दी द्यावी. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!