*कोकण Express*
*मुंबई महानगरपालिका भायखळा नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे यांची वैभववाडी तालुका शिवसेना कार्यालयाला भेट*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
आज दि.12/10/2021 रोजी मुंबई महानगरपालिका भायखळा नगरसेवक श्री. रमाकांत रहाटे यांनी वैभववाडी तालुका शिवसेना कार्यालयाला भेट दिली. तसेच शिवसेना तालुक्यातील संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला व संघटना वाढीसाठी विभाग निहाय, गाव निहाय कशी बांधणी करून पक्ष संघटना वाढवता येईल या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी वैभववाडी तालुका शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य संभाजी रावराणे, शहरप्रमुख प्रदीप रावराणे, उपविभाग प्रमुख राजेश तावडे, युवासेना कोकिसरे विभाग प्रमुख रोहित पावसकर तथा नाधवडे ग्रामपंचायत सदस्य , सांगूळवाडी शाखाप्रमुख स्वप्निल रावराणे, सांगूळवाडी बुथप्रमुख संतोष रावराणे, सुनिल रावराणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.