कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत जनशिक्षण संस्थान यांच्या वतीने नांदगाव येथे इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षण उद्घाटन

कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत जनशिक्षण संस्थान यांच्या वतीने नांदगाव येथे इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षण उद्घाटन

*कोकण Express*

*कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत जनशिक्षण संस्थान यांच्या वतीने नांदगाव येथे इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षण उद्घाटन*

*कोरोना व विद्यार्थ्यांचा सकस आहार यावरही मार्गदर्शन

*कणकवली ः प्रतिनिधी*

नांदगाव ग्रामपंचायतीच्या 14 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण अंतर्गत जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग यांच्या मार्फत नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्टच्या सहकार्याने नांदगाव येथील युवकांच्या मागणी नुसार इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षण उद्घाटन. सभापती मनोज रावराणे व जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे. यावेळी नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर उपसरपंच निरज मोरये, डॉ नागवेकर मेडम, ग्रामविकास अधिकारी हरमळकर ग्रामपंचायत सदस्य अरुण बापार्डेकर,गवस साठविलकर, रेणूका पाटील,रमिजानबी बटवाले, जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग चे रमेश खरात इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षक शशिकांत मेस्त्री,मोरजकर ट्रस्ट अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर तसेच शाळा मुख्याध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी कोरोना व विद्यार्थ्यांचा सकस आहार यावरही मार्गदर्शन करण्यासाठी कणकवली येथील डॉ नागवेकर मेडम, यांनी शाळा सुरू झाल्या आहेत.तेव्हा पालकांनी व विद्यार्थी यांनी काय काळजी घ्यावी व सकस आहार कोणता घ्यावा लागतो याबाबत मार्गदर्शन केले आहे. यावेळी नांदगाव आरोग्य केंद्रातून वैद्यकीय अधिकारी डॉ तपसे हेही उपस्थित होते. यावेळी सभापती मनोज रावराणे यांनी बोलताना सांगितले की,आता कोरोना संपला नसून शाळा सुरू झाल्या आहेत तेव्हा पालक व विद्यार्थी शिक्षक वृंद यांनी योग्य काळजी ‌घ्यावी असे आवाहन त्यांनी केले तर इलेक्ट्रिक टेक्निशियन प्रशिक्षणासाठी ही शुभेच्छा देवून युवकांना अशा व्यवसाय प्रशिक्षाचीच गरज आहे तेव्हा या प्रशिक्षणाचा लाभ योग्य प्रकारे घ्यावा व यातून व्यवसाय निर्माण करावेत असे आवाहन त्यांनी केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद तांबे,प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी हरमळकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!