*कोकण Express”
*कासार्डे सिलिका खाण कामगाराचा जंगलात आढळला मृतदेह*
कासार्डे येथील सिलिका कामगार लालचंद रामू राठोड (वय 45 ,सध्या राहणार रा. कासार्डे देऊलकरवाडी, ता.कणकवली) यांचा मृतदेह आवळेश्वर माळ जंगलात आढळून आला. रविवारी10 ऑक्टोबर रोजी हाताला मुका मार लागल्यामुळे डॉक्टरकडे जाऊन येतो असे सांगून लालचंद घरातून बाहेर पडला होते.ते रात्रभर घरी परतले नाही. त्याचा नातेवाईकांनी शोध घेतला असता लालचंद याचा मृतदेह आवळेश्वर माळ जंगलात आढळून आला.लालचंद राठोड यांचे मुळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील अचलेर ता. तुळजापूर येथे आहे. सिलीका खाणीवर संपूर्ण कुटुंब काम करीत असे. या घटनेची खबर लालचंद याचा मुलगा प्रदीप राठोड याने कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे.