महाभूमी प्रकल्पाच्या राज्‍यसमन्वयक यांची तातडीने बदली करा

महाभूमी प्रकल्पाच्या राज्‍यसमन्वयक यांची तातडीने बदली करा

*कोकण Express*

*महाभूमी प्रकल्पाच्या राज्‍यसमन्वयक यांची तातडीने बदली करा*

*तलाठी संघटनेच्यावतीने देवगड तहसील समोर निदर्शने*

*देवगड ः प्रतिनिधी*

राज्य समन्वयकांची तातडीने बदली करा
सिंधुदुर्ग तलाठी महासंघाचा विजय असो अशा घोषणा देत देवगड तालुका तलाठी संघाने सोमवारी सकाळी देवगड तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने केली.
यावेळी देवगड तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष व्हि डी तानवडे
सचिव यु.जी.कदम,खजिनदार डाके, राहूल निग्रे,जे.एस साईल,मंगेश यादव,कडूलकर, सुनिता मेस्त्री, मोसमी शिरसाट, निपाणीकर,विजयकुमार सरवदे, सुनील राठोड, डि एम साटम ,दीपक पावसकर यांसह देवगड तालुक्यातील सर्व तलाठी,मंडल अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी संवर्ग नायब तहसीलदार आदी उपस्थित होते.

राज्य तलाठी महासंघाच्या अध्यक्षांनी सोशल मीडियावर टाकलेल्या मेसेजबाबत ई-महाभूमी प्रकल्पाचे राज्य समन्वय रामदास जगताप यांनी अपशब्द काढल्याने राज्यभरातील तलाठी संतप्त झाले आहेत. शासनाने तातडीने त्यांची बदली करावी, अन्‍यथा संगणकीय कामकाज बंद करू, असा इशारा रत्‍नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्या वतीने देण्यात आला होता. . या बाबतचे निवंदन मा. श्री. रविंद्र मठपती उपजिल्‍हाधिकारी सामान्‍य प्रशासन रवींद्र मठपती यांना शुक्रवारी यांचेकडे ८ आँक्टोबर रोजी देण्यात आले होते.याद्रूष्टीने सोमवारी देवगड तालुका तलाठी संघाच्या वतीने देवगड तहसील समोर निदर्शने करण्यात आली.

राज्‍यभरात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यासोबतच ई पीक पाहणी व मोफत सातबारा वाटपाचे कामही केले जात आहे. हे काम प्राधान्याने करावे, असा संदेश राज्य तलाठी महासंघटनाचे अध्यक्ष श्री.ज्ञानदेव डुबल अप्पा यांनी सर्व तलाठ्यांना सोशल मीडियावरून दिला होता. हाच संदेश पुण्याचे जिल्हाध्यक्ष यांच्या ग्रुपवर पाठविला होता. त्‍या संदेशास प्रतिक्रीया देताना मूर्खासारखे असे मेसेज सोशल मीडियावर का टाकला, असा प्रश्न राज्य समन्वयक सामान्य प्रशासन यांनी विचारला अशा अपशब्दामुळे राज्य तलाठी महासंघाच्या अध्यक्षांचा अपमान झाल्याने तलाठी संघटना आक्रमक झाली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रत्‍नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्या वतीने निषेध केला जातआहे. राज्य समन्वयक या पदावर जगताप यांची तातडीने बदली करण्यात यावी, अन्‍यथा तलाठी संघटना संगणकीय कामकाज करणार नाही, असा इशारा देऊन महाराष्‍ट्रराज्‍य तलाठी संघाने आंदोलनात्‍मक पवित्रा घेतलेला असून या आंदोलनास पाठिंबा म्‍हणून रत्‍नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ आंदोलनात सहभागी होत आहे. अशी माहिती देवगड तालुकाध्यक्ष तानवडे यांनी दिली.
१२ ऑक्टोबर रोजी लोकप्रतिनिधींना निवेदन दिले जाणार आहे. याउपरही रामदास जगताप यांच्यावर कारवाई न झाल्यास १३ ऑक्टोबर पासून कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!