*कोकण Express*
*वेंगुर्लेत लखीमपूर येथील “त्या” घटनेचा आघाडीतर्फे निषेध*
*तहसीलदार यांना दिले निवेदन : बंद ला अल्प प्रतिसाद..*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ वेंगुर्ले तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आज पुकारलेल्या बंदला तालुक्यात अल्प प्रतिसाद लाभला. महाविकास आघाडी तर्फे वेंगुर्ले तहसील कार्यालया बाहेर योगी सरकार चे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीचा विजय असो असे म्हणत शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा देऊन संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आणि या बाबतचे निवेदन तहसीलदार प्रवीण लोकरे यांना दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एम.के. गावडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी सुनील डूबळे, प्रकाश डिचोलकर, अजित राऊळ, सत्यवान साटेलकर, जगन्नाथ डोंगरे, नितीन कुबल, प्रज्ञा परब, नम्रता कुबल, अस्मिता राऊळ, कृतिका कुबल, दादा सोकटे, संदेश निकम, रोहन वराडकर, विवेक आरोलकर, संदीप केळजी, पंकज शिरसाट, वामन कांबळे, हेमंत मलबारी, सुरेश भोसले, प्रशांत परब यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.