*कोकण Express*
*कुडाळाचे आ. नाईक यांचे कणकवलीत व्यापाऱ्यांना त्रास देण्यासाठी नाटक ; कणकवली भडकवण्याचा प्रयत्न*
कुडळाच्या आमदारांनी कणकवलीत नाटक करू नये.पूर्वीची शिवसेना आता राहिली नाही. जेव्हा शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आदेश देत होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र बंद होत होता.आता तसे होणार नाही.कुडळाचे आम.वैभव नाईक हे कुडाळ, मालावण च्या व्यापाऱ्यांना त्रास द्यायला गेले नाहीत तर ते मुद्दामहून कणकवलीत व्यापाऱ्यांवर जबरस्ती करण्या साठी आलेत.त्यांना कणकवलीच्या व्यापाऱ्यांनी जुमानले नाही.हा व्यापार आणि बाजारपेठ कितीही जबरस्ती केलात तरी सुरली चालू राहणार शिवसेनेच्या दाहशतीला कणकवलीचे व्यापारी फिख घालणार नाही असा इशारा कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.
दरम्यान नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कणकवलीत सर्व बाजारपेठ फिरून व्यापार सुरू ठेवणाऱ्या दुकांदारांचे गुलाब पुष्प देऊन आभार मानले आणि व्यापार चालू ठेवा कोण दबाव आणत असेल तर घाबरू नका.आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगितले.यावेळी तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री,महेश गुरव,शिशिर परुळेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.