*कोकण Express*
*महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला बांदा व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद नाही….*
*आठवडा बाजार भरवला; बाजारपेठेत या, सरपंचांचे ग्राहकांना आवाहन…*
*बांदा ः प्रतिनिधी*
उत्तरप्रदेश लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना भारत बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते, मात्र सावंतवाडी तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या बांदा बाजारपेठेत याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. येथील आठवडा बाजारासाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी दाखल झाले आहेत. बाजारपेठ बंद नसल्याने व्यापारी व ग्राहकांनी बाजारपेठेत यावे असे आवाहन सरपंच अक्रम खान यांनी केले आहे.