*कोकण Express*
*कुडाळ पावशीत घरावर विद्युतभारित तार पडली…*
*सुदैवाने मोठा अनर्थ टळला*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
पावशी देऊळवाडी येथील पुंडलिक वासुदेव तवटे यांच्या घरावर ३३ हजार केव्ही होल्टेज वाहिनी अचानक तुटून पडली. त्यानंतर वीज वाहिन्यांमध्ये स्पार्किंग होऊन मोठा आवाज झाला. या घटनेने मोठा थर काप उडाला. या घटनेत श्री तोटे यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दरम्यान वीज वाहिनी तुटून पडली तरी वीज पुरवठा चालूच होता मात्र सुदैवाने देवाने जीवित हानी टळली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचण्यास हलगर्जीपणा केल्याचा आरोप माजी सरपंच श्रीपाद उर्फ पप्या तवटे यांनी केला.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत पावशी देऊळ वाडी येथे सातेरी मंदिरासमोर तवटे यांचे घर आहे त्यांच्याबरोबर भेज बहिणीची तार तुटून खाली पडल्यामुळे घरातील वायरिंग मध्ये स्पार्किंग होतं होते. त्यामुळे घरातील इलेक्ट्रॉनिक वायरिंग, फ्रिज, मोटर, टीव्ही, इन्वर्टर पंखे व अन्य उपकरणे जळून नुकसान झाले या घटनेची माहिती तात्काळ वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र अधिकारी तासाभराने घटनास्थळी दाखल झाले व खाली पडली तरी उशिराने अधिकारी दाखल झाले. यात त्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप माजी सरपंच श्रीपाद उर्फ पप्प्या तवटे यांनी केला दरम्यान लागली स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्यात सहभाग झाले. सोमवारी या घटनेची नुकसानीची पंचयादी करण्यात आली आहे. सुमारे 1 लाख 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या ठिकाणचे वीज वाहिन्या धोकादायक बनल्या असून भूमिगत वीजवाहिन्या देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.