*कोकण Express*
*वैभववाडीत केंद्र सरकारच्या ‘ई श्रम’ कार्ड योजनेबाबत माधव भंडारी करणार ऑनलाईन मार्गदर्शन…*
वैभववाडी येथे केंद्र सरकारच्या ‘ई श्रम’ कार्ड योजनेचे मंगळवार दिनांक ५ अॉक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे अॉनलाईन मार्गदर्शन होणार आहे. हा कार्यक्रम राजापूर अर्बन बँक येथील सभागृहात आयोजित केला आहे. योजनेचे आयोजन प्रवण फार्मर कंपनी यांनी केले आहे.
‘ई श्रम’ योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने आणली आहे. ‘ई श्रम’ पोर्टल मध्ये आपली नाव नोंदणी करुन केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. पोर्टल मध्ये नाव नोंदणी केलेल्या कामगारांना मोफत २ लाखांचा अपघाती विमा मिळणार आहे.
वय वर्षे १६ ते ५९ वयोगटातील सर्व असंघटित कामगार आपली नाव नोंदणी करु शकतात. पोर्टल मध्ये शेतमजूर, रिक्षा चालक, सलुन कामगार, बांधकाम कामगार, घरेलु कामगार, अंगणवाडी सेविका,आशा सेविका, इत्यादी क्षेत्रातील कामगार नाव नोंदणी करु शकतात.
प्रवण फार्मर कंपनी आयोजित केलेल्या ई श्रम योजना कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वैभववाडी तालुका सभापती सौ.अक्षता डाफळे , जि. प. सदस्य सुधीर नकाशे कंपनीचे अध्यक्ष महेश संसारे संचालक प्रमोद रावराणे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास वैभववाडी तालुक्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजू पवार यांनी केले आहे.