*कोकण Express*
*फोंडाघाट- कॉलनी परिसरात चोरीचा अयशस्वी प्रयत्न; चोरट्यांना पकडून जागरुक ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात…*
फोंडाघाट- पाटबंधारे कॉलनी परिसरात एका बाजूला बंद असलेल्या लाड यांच्या बंगल्या मागील रेलिंग पारईने तोडून व खिडकीची काचेची तावदाने फोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.लगतच काम करणाऱ्या जागृत ग्रामस्थांमुळे अयशस्वी ठरला. ग्रामस्थांनी दोन्ही चोरट्यांना पकडून यथेच्छ चोप दिला आणि पोलीस कॉन्स्टेबल मुल्ला यांना बोलवुन त्यांच्या ताब्यात दिले.दीपक इस्वलकर, रणजीत सोलकर, वैभव डफळे, संदीप विश्वकर्मा अशी ग्रामस्थांची नावे आहेत. स्थानिक चोरटे जाधव व त्याचा सहकारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपासासाठी त्यांना कणकवलीस घेवुन गेले आहेत .
*चोरांना पकडून दिले ते स्थानिक ग्रामस्थ*
गावात सध्या चालू असलेला हनुमान आणि राधाकृष्ण मंदिरात तील अखंड हरिनाम सप्ताह च्या वर्दळीत पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे. ग्रामस्थांच्या जागरुकतेचे येथे कौतुक होत आहे.