*कोकण Express*
*ग्रामपंचायत कोळोशी येथे ई पिक पाहणी ॲप नोंद जनजागृती कार्यक्रम संपन्न…*
*तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले मार्गदर्शन…*
शासनाच्या ई पिक पाहणी ॲप द्वारे आपल्या पिकाची नोंद ७/१२ सदरी ऑनलाईन करणेबाबत शेतकऱ्यांना माहिती करून देण्यासाठी ग्रामपंचायत कोळोशीमार्फत जनजागृती कार्यक्रम आज रोजी आयोजित करण्यात आला होता. यामध्ये उपस्थित शेतकऱ्यांना या ॲप मध्ये कशा प्रकारे नोंद करावी, याचे प्रात्यक्षिक दाखविले गेले .यावेळी कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी उपस्थित शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करताना या ॲपद्वारे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंद करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सरपंच रितिका सावंत, मंडळ अधिकारी नांदगाव श्री. खाडे, तांत्रिक सहाय्यक बाजीराव काशीद, तलाठी लुडबे, ग्रा. पं. सदस्य विश्वनाथ कदम, सुशील इंदप, सानिका इंदप, पोलीस पाटील संजय गोरूले तसेच शेतकरी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी विचारलेल्या शंकांचेही शंकानिरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक मंगेश राणे यांनी केले तर आभार कृषिसहाय्यक श्रीमंत बुधावले यांनी मानले.