*कोकण Express*
*काळ्या मातीत राहून नियतीने दिलेल्या अपंगत्वावर मात करीत पॅरा स्विमिंगमध्ये चमकदार कामगिरी…*
अर्जुन पुरस्कारप्राप्त सुयश जाधवचा फोंडाघाट येथे सत्कार
काळ्या मातीत राहून नियतीने दिलेल्या अपंगत्वावर मात करीत पॅरा स्विमिंगमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीमुळे सुयश जाधवला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे.काही कामानिमित्त सुयश जाधव कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथे आला असल्याने फोंडाघाट ग्रामस्थांच्यावतीने सुयश जाधवचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जि. प. कृषी समिती सभापती संदेश पटेल, सुभाष सावंत, संजय सावंत, दिपक इस्वलकर, ओंकार देसाई, राज सावंत, जितेंद्र सावंत, वैभव साळुंके यांच्या सह ग्रामस्थ उपस्थीत होते.
फोंडाघाट ग्रामस्थांच्यावतीने सुयेश जाधव यांचा सत्कार करण्याचे भाग्य आम्हा फोंडावासियांना लाभले अशी प्रतिक्रिया यावेळी माजी जि. प. कृषी समिती सभापती संदेश पटेल यांनी व्यक्त केली. सुयश जाधव याने राज्य स्तरावर ५० सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर ३७ सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ सुवर्ण पदकांसह आजवर १११ पदकांची कमाई केली आहे. २०१६ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुयशने देशासाठी पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळवीत मोठा सन्मान मिळवून दिला होता.
टोकियोमध्ये झालेल्या पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना निसटता पराभवाला सामोरे जावे लागले अश्या कर्तबगार व्यक्तीचा फोंडाघाट ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.