*कोकण Express*
*व्यावसायीक गाड्यांचे थकीत रोड टँक्स वरील व्याज, दंड व्याज माफ करा…!*
*काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांची मंत्री सतेज पाटील यांच्याकडे मागणी…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी मंत्री सतेज पाटील यांची ओरोस येथे भेट घेवुन व्यावसायीक गाड्यांवरचे थकीत रोड टँक्स वरील व्याज व दंडव्याज माफ करण्याची मागणी केली. सध्या 2 वर्ष कोविड काळ व त्या आधी माल वाहतुक व्यवसायावरील मंदी मुळे काही वाहने बंद आहेत परंतु नाँनेज न केल्यामुळे सदर वाहनांवरील रोड टँक्स वरील व्याज व दंड व्याज हे रोड टँक्स पेक्षा कितीतरी अधिक आहे. जर ते माफ करुन फक्त रोड टँक्स भरुन वाहन परवाने दिल्यास व्यावसायीकांना दिलासा मिळेल. यावेळी सदर विषय हा पुर्ण महाराष्ट्रा विषयी असुन यावर लवकरच योग्य निर्णय घेऊन व्यावसायीकांना दिलासा मिळण्यासाठी निश्चित प्रयत्न करु, असे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले.