*कोकण Express*
*वैभववाडी (उंबर्डे )प्राथमिक आरोग्य केंद्रास एक रुग्णवाहिका द्यावी*
*पालकमंत्री उदय सामंत यांना वैभववाडी शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांची निवेदनाद्वारे मागणी*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यास नुतन १४ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातील एक रुग्णवाहिका वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रास द्यावी, अशी विनंती वैभववाडी तालुका शिवसेनेच्या वतीने पालकमंत्र्यांकडे केली आहे.
वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेली रुग्णवाहिका छोटी व सुस्थितीत नसल्याने नवीन रुग्णवाहिकेची आवश्यकता आहे. उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या या रुग्णवाहिकेचा जवळपासच्या १७-१८ गावातील रुग्णांना फायदा होणार आहे व सद्यःस्थितीत रुग्णांची होणारी गैरसोय टळणार आहे. त्यामुळे १४ मधील १ रुग्णवाहिका वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रास द्यावी, अशी विनंती वैभववाडी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.