*कोकण Express*
*खारेपाटण सेवा सोसायटी संस्थेच्या प्रगतीत सभासदाचा सहभाग मोठा :विजय देसाई*
खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड खारेपाटण या शेतकरी संस्थेची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे विद्यमान चेअरमन विजय देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात झाली. खारेपाटण सोसायटीच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला जि प स्थायी समितीचे सदस्य तथा विद्यमान संचालक रवींद्र उर्फ बाळा जठार,पं स सदस्या तथा खारेपाटण सोसायटीच्या संचालिका सौ. तृप्ती माळवदे,खारेपाटण उपसरपंच तथा सोसायटीचे संचालक इस्माईल मुकादम,एकनाथ कोकाटे, श्रीधर गुरव, मंगेश गुरव,सुरेंद्र कोरगावकर, बलराम बाणे आदी उपस्थित होते. तर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शेट्ये,संतोष पाटणकर,रघुनाथ उर्फ भाऊ राणे,नंदकिशोर कोरगावकर, चिंचवली उपसरपंच अनिल पेडणेकर आदी पदाधिकारी विशेष उपस्थित होते. खारेपाटण सोसायटीच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याहीवर्षी दशक्रोशीतील इयत्ता – १० वी व १२ वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. खारेपाटण हायस्कुलची विद्यर्थिनी प्रिया प्रसाद मालंडकर हिने दहावी परीक्षेत ९७.२०% गुण मिळविल्याबद्दल संस्थेचे चेअरमन विजय देसाई यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला.तर खारेपाटण ज्युनिअर कॉलेज १२ वी सायन्स बारावी परीक्षेत कु.सानिका अनिल पराडकर ही विद्यर्थिनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचा तृप्ती माळवदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार यंदा नडगीवे येथील प्रयोगशील शेतकरी गणेश दत्ताराम कर्ले यांना जाहीर करण्यात आला.संस्थेचे चेअरमन विजय देसाई यांच्या हस्ते गणेश कर्ले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे सचिव कृष्णा दामोदर कर्ले यांना सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सिंधुदुर्ग यांचा उत्कृष्ट सहकारी कर्मचारी व आदर्श सचिव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प पु भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे मॅनेजर वामन पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी सह्ययक श्री .पाटील यांनी ई पीक पाणी ऑनलाइन नोंदीविषयी मार्गदर्शन केले. “कुठलीही संस्था प्रगती पथावर जात असताना त्या संस्थेचे सभासद यांचा सहभाग त्यामध्ये मोठा असतो.आणि आपण सर्व सभासद संस्थेला मोठं करत आहातआणि म्हणून खारेपाटण सोसायटीला विविध पुरस्कारांनी यावेळी गौरविण्यात आले असल्याचे आपल्या प्रास्तविक भाषणात चेअरमन विजय देसाई यांनी सांगितले. संस्थेचे सचिव कृष्णा कर्ले यांनी वार्षिक सभेचे कामकाज चालवीले व सभा सुत्रसंचलन संस्थेचे माजी चेअरमन रवींद्र जठार यांनी केले . तर सभेचा समारोप संस्थेचे संचालक एकनाथ कोकाटे यांनी केला. सभेला खारेपाटण दशक्रोशीतील शेतकरी सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.