*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडेरेशनतर्फे उद्या जागतिक पर्यटनदिन*
*दीपक माने , समीर नलावडे,परशुराम उपरकर यांची उपस्थिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडेरेशनतर्फे येत्या सोमवार 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत मातोश्री मंगल कार्यालय हॉल येथे जागतिक पर्यटन दिन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास एमटीडीसीचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे व्यवस्थापक दीपक माने ,कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे,माजी आम.परशुराम उपरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी जिल्हयातील विविध पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकाना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविणयात येणार आहे . याप्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास संस्था फेडेरेशनतर्फे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी केले आहे.