*कोकण Express*
*प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली-भेडशी व तळकट या आरोग्य केंद्रांना मिळणार सुसज्ज रुग्णवाहिका*
*जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबुराव धुरी यांनी दिली माहिती..*
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे राज्यात ४६३ रुग्णवाहिका जाहिर झाल्या असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात यातील ११ रुग्णवाहिका जिह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देणात येणार आहेत तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १, व पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला १ रुग्णवाहिका अशा प्रकारे देण्यात येणार आहे.
२८ सप्टेंबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ओरोस येथे लोकार्पण झाल्यानंतर दोडामार्ग तालुक्यातील साटेली-भेडशी, तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात दोडामार्ग सभापती, उपसभापती तथा लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत जनसेवेसाठी दाखल होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश लाभले आहे.
दिनांक २८ सप्टेंबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दोडामार्ग मधील साटेली-भेडशी व तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका दिली जाणार आहे राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन मधून सदर रुग्णवाहिका प्राप्त झाले आहेत तरी लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा मुख्यालय ओरस येथे उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी केले आहे.