*कोकण Express*
*कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी ‘तिमिरातुनी तेजाकडे’शैक्षणिक चळवळ सुरू*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
‘तिमिरातुनी तेजाकडे’ या सामाजिक संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात फेब्रुवारी २०२१ व सप्टेंबर २०२१ मध्ये एकूण ३६ व्याख्याने one man show स्वरूपात घेऊन ऐतिहासिक नोंद करणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कवठणी (बोरभाटवाडी) येथील मुंबईस वास्तव्यास असणारे सिंधुदुर्गचे भूमिपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांनी ही शैक्षणिक चळवळ सुरु केली आहे.
जिल्ह्यातून प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी घडावेत यासाठी आतापर्यंत कधीही उपोषणे, निदर्शने झाले नाहीत किंवा मोर्चे सुद्धा काढले गेले नाहीत. कोकण बोर्ड अव्वल क्रमांकावर असून देखील हुशार विद्याथी यांना मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते मागे पडतात. जिह्यातून त्या प्रमाणात यशोगाथा ऐकावयास मिळत नाहीत. यश मिळाले की समाजातील इतर विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारे क्वचितच असतात. ह्याच गोष्टीची खंत व जिल्ह्यातील, कोकणातील विद्यार्थ्यांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी श्री. सत्यवान रेडकर हे एकमेव व प्रथम व्यक्ती तसेच अधिकारी आहेत जे कोणतेही मानधन न घेता, स्वखर्चाने गावात, शाळेत, अंगणात, घरात, मंदिरात, मिळेल त्या ठिकाणी नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने घेत आहेत. हा अवलिया स्वतः उच्च शिक्षा अर्जित करून आपल्या व्यस्त आयुष्यातील वेळ जिल्ह्यातील तसेच कोकणातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी देत आहे.
त्यांची ‘तिमिरातुनी तेजाकडे’ म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी ही शैक्षणिक चळवळ येत्या भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच संपूर्ण कोकणात अभूतपूर्व परिवर्तन घडवून आणेल व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे गाव नक्कीच घडेल यात काहीच शंका नाही.
जास्तीत जास्त जिल्ह्यातील, विविध तालुक्यातील, गावातील, पंचक्रोशीतील विद्यार्थी तसेच पालकवर्गांनी त्यांच्या विविध समूहात समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करावेत व त्यांच्या नि:शुल्क मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी ९९६९६५७८२० या क्रमांकावर व्हाट्सअप तसेच कॉलच्या माध्यमातून संपर्कांत राहावे असे आहवान करण्यात आले आहे.