*कोकण Express*
*वेंगुर्ला तालुका शिवसेना सार्वजनिक नवरात्रौत्सव कमिटी कार्यकारणी जाहीर…*
*अध्यक्ष पदी यशवंत परब तर उपाध्यक्ष पदी गजानन गोलतकर यांची निवड*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
वेंगुर्ला तालुका शिवसेना पुरस्कृत सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ कमिटीची कार्यकारणी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष पदी यशवंत उर्फ बाळू परब यांची तर उपाध्यक्ष पदी गजानन गोलतकर यांची निवड करण्यात आली आहे.
वेंगुर्ले मध्ये शिवसेने तर्फे सार्वजनिक नवरात्रोत्सानिमित्त ७ ते १५ ऑक्टोंबर या नऊ दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या कार्यक्रमासाठी उत्सव कमिटीच्या कार्यकारणी मध्ये सचिव पदी संदिप केळजी, दिलीप राणे, हेमंत मलबारी यांची, सल्लागार म्हणून विवेक आरोलकर, सचिन वालावलकर, सुरेश वराडकर, सुरेश भोसले यांची, खजिनदार म्हणून अजित राऊळ, सांस्कृतिक विभागासाठी डेलिन डिसोजा, सुहास मेस्त्री, सुनिल वालावलकर, व्यवस्थापन कमिटी मध्ये अभिनव मांजरेकर, कांता घाटे, पिंट्या गावडे, प्रसाद मांडये, आनंद बटा, राहूल नरसाळे, करण राऊळ यांची आणि दुर्गामाता पुजन कमिटी मध्ये अभि मांजरेकर, दिलीप राणे यांची निवड करण्यात आली आहे.